सोमवार, ३ जून, २०१३

घे भरारी


घे भरारी 

"मला आणि आईला तुम्हाला भेटायचे आहे कधी येऊ ?" समिधाचा २०१०च्या  ऑक्टोबर महिन्यात फोन. कधी भेटायचे तो दिवस आणि वेळ ठरली. ठरल्या दिवशी दोघी आल्या. आईनेच सुरवात केली,"हिचे लग्नाचे योग कधी आहेत ? ते बघा जरा.  आता स्थळ येतात तर ही लगेच नाही म्हणते. अजून शिकायचं म्हणते. आमच्या समाजात मुलीना जास्त शिकवत नाहीत. नोकरी तर करू देत नाहीत त्यामुळे शिकवून काय फायदा ? आणि शिकलेल्या मुलींची लग्न लवकर होत नाहीत हो madam.  B.com. तर झाली त्यानंतर MBA करतेय.  मला तर काही समजत नाही काय करायचं ते. तुम्हीच समजावा."

मी समिधाच्या कुंडलीचा आढावा घेण्यास सुरवात केली. आजकालच्या मुला-मुलींना लग्नाची घाई नसते आणि लग्ना आधी "settle"  व्हायचे असते. त्यामुळे किंवा मग साथीदाराची निवड झालेली असते परंतु सध्या घरी सांगायचे नसते अशा काही कारणांमुळे मग आलेल्या स्थळांना नकार देणे असे प्रकार सुरु असतात. असेच काहीसे मला समिधाच्या बाबतीत वाटले. परंतु तिच्या कुंडलीचा आढावा घेत असतानांच मला जाणवले कि माझा अंदाज साफ चुकीचा आहे. समिधाची कुंडली खालीलप्रमाणे :

समिधाची कुंडली 

वैदिक पद्धतीने :  १) वृषभ लग्न आणि मकर राशीची कुंडली. दोन्ही पृथ्वी तत्वाच्या राशी.
२) मकर राशीचा चंद्र म्हणजे ह्या व्यक्ती आपल्या कर्माबद्दल नेहेमीच सतर्क असा माझा अनुभव आहे.  
३) लग्नेश शुक्र जो  षष्ठेशही आहे तो स्वतः धन स्थानात बुधाच्या राशीत. बुध म्हणजे व्यापारीवृती. ज्यांचा बुध चांगला ते मातीही सोन्याच्या भावात विकू शकतील. इथे लग्नेश स्वतः बुधाच्या राशीत.
४) दशम स्थान - ज्यावरून व्यक्ती नोकरी करणार कि व्यवसाय हे समजते. इथे दशमाचा स्वामी शनि सप्तमात  वृश्चिक राशीत. दशमाचा संबंध साप्तमाशी. गेल्या एका लेखात(योगेश पाटील) - आपण पहिलेच दशम आणि सप्तम ह्यांचा संबंध म्हणजे व्यक्ती मुळातच व्यापारीवृत्तीची असते.

कृष्णमुर्तीपद्धतीने :  १) लग्नाचा SL - गुरु - १०, ८, ११   NL -  गुरु - १०, ८, ११  म्हणजेच लग्नाचा सबलॉर्ड सुद्धा दशमाचा कार्येश. ही व्यक्ती नोकरी करणार नाही हे निश्चित.

२) षष्ठ स्थानाचा SL - बुध - १२, २, ५  NL - चंद्र - ८  ३)षष्ठाचा सबलॉर्ड पंचमाचा कार्येश म्हणजे नोकरी करणार नाहीच आणि केली तरी फार काळ टिकणार नाही.

मी आईना म्हटलं," ही काही नोकरी करणार  नाही."

मी पुढे काही बोलण्याच्या आधीच आई," मग तेच तर म्हणते मी. नोकरीसाठी आम्ही काही बोलत नाही पण मग लग्नाचं तरी बघावं."

जेंव्हा समिधा माझ्याकडे आली होती तेंव्हा तिला राहू महादशा आणि  बुधाची अंतर्दशा सुरु होती. बुध - १२, २, ५  NL - चंद्र ८ ३. बुध अंतर्दशा संपणार ऑक्टोबर २०१२ला. म्हणजे तोपर्यंत तरी MADAM बोहल्यावर चढणार नाहीत हे नक्की. आईना तसे सांगितल्यावर त्यांचा हिरमोड झाला.
आता समिधाची कळी खुलली. समिधा," तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. मी दोन ते तीन ठिकाणी नोकरीसाठी गेले होते परंतु प्रत्येक ठिकाणी ३ दिवसापेक्षा जास्त राहूच शकले नाही. मला नोकरी करायची नाही हे मी निश्चित केले आहे आणि दोनच दिवसापूर्वी मी एका सेमिनारला गेले होते तिथे एका BUSINESS बद्दल सांगत होते. मला त्यांचा CONCEPT आवडला. त्यांनी खूप छान EXPLAIN  केले. त्यांची FRANCHISEE घ्यायची आणि BUSINESS पुढे चालवायचा. सुरवातीला सगळी मदत ते करणार. जागा आपली आणि ७ ते ८ जण आपल्याला ह्या कामासाठी लागतील."
मी म्हटले,"O.K. पण हा CONCEPT काय आहे ?"
समिधा,"आपल्याला जे MOBILE वर एखाद्या ऑफरबद्दल SMS येतात जसे hmmmm तुम्हाला car loan हवे असेल तर ह्या नंबरवर संपर्क करा किंवा astrology consultation हवे असेल तर ह्या नंबरवर फोन करा. हे असे sms आपण bulk मध्ये पाठवतो म्हणजेच थोडक्यात एखाद्या व्यक्तीच्या business बद्दल आपण advertise करायची. ह्यासाठी लागणारा Database (फोन नंबर) ज्यांच्याकडून franchisee घेऊ त्यांच्याकडून मिळणार."

वरती आपण पाहिलेच बुध म्हणजे व्यापार. बुध एखादी गोष्ट खुलवुन सांगू शकतो. बुधाकडे convincing power आहे.  कुंडलीत लग्नात बुध, लग्नेश शुक्र बुधाच्या राशीत आणि षष्ठ स्थानाचा सबलॉर्ड पण बुधच.अंतर्दशाही बुधाचीच.  काय ? काही लक्षात आले का वाचकांच्या ?? 
समिधाला म्हटले,"बिनधास्त सुरु कर."  बाकीचे औपचारिक बोलणे झाले आणि आई आणि समिधा निघणार तेवढ्यात पुन्हा आईंचा प्रश्न,"आमच्याकडे मुली शिकतच नाहीत तर नोकरी कुठून करणार ? हि हुशार म्हणून शिकली पण आता ही म्हणते business करायचा. कस काय व्हायचं हीच पुढे?? पुढचं जाऊदे आता हिच्या बाबांना काय सांगायचं ?? ते तर नाहीच म्हणतील. ही तर म्हणते businessला जागा पाहिजे. मग जागा वगैरे कशी काय होईल ??  कोण देईल जागा ??"
समिधा संपूर्ण गृहपाठ करून आली होती. तिला आई- बाबांच्या विरोधाची कल्पना होती. समिधा,"madam मी जागा बघून ठेवली आहे. सध्या भाडे तत्वावर घेईन. भाडं सुद्धा कमी आहे. सध्या त्या जागेत एक भाडेकरू आहेत. त्यामुळे ती जागा आपल्याला कधीपर्यंत मिळू शकेल हे कळू शकेल का ?"
समिधाच्या कुंडलीत चतुर्थेश आहे रवि. रविची विदशा सुरु होणार मार्चच्या एक तारखेला. तिला म्हटले,"मार्चच्या पहिल्या तारखेला जागा मिळेल".  समिधा खुश झाली.

 मार्चच्या पहिल्या तारखेला आठवणीने तिने फोन केला. जागा ताब्यात आली आणि उद्यापासून म्हणजेच दोन तारखेपासून office सुरु करणार. तिला शुभेच्छा दिल्या. पण एक गोष्ट खटकत होती ती म्हणजे बुधाच्या अंतर्दशेत ह्या गोष्टी घडल्या. बुध म्हणजे Duality. आता Dualityचा संदर्भ लागत नव्हता. 

मधल्या काळात ती माझ्या Continuous Contact मध्यॆ होती. तिची प्रगती पाहून आई- बाबांचा विरोध मावळला होता. अत्यंत खुश होती पण बोलता बोलता नेहेमी म्हण्याची मला अजून काहीतरी करायचे आहे पण काय ते काळात नाही. हा business सध्या व्यवस्थित settle होतोय मग अजून एखादा business option चा विचार करतेय. पण options मिळत नाहीयेत. 
आणि २०१२ च्या सप्टेंबरला ती भेटायला आली."madam business तर व्यवस्थित सुरु आहे आणि अजून एक (बुध - duality - दोन business )  संधी मला मिळतेय. माझ्या ओळखीत एक व्यक्ती आहे त्यांचा घरगुती पापडाचा business आहे. त्यांचे स्वतःचे पापड बनवण्याचे machine आहे. पण सध्या त्यांना त्यांच्या आजारपणामुळे लक्ष देत येत नाही. तर ते machine मला विकण्याची त्यांची इच्छा आहे. रक्कम खूप मोठी आहे आणि machine ठेवायला जागा पण लागेल. जागेसाठी शोधाशोध सुरूच आहे आणि machine साठी लागणारे पैसे आहेत माझ्याकडे. आता प्रश्न एवढाच आहे की  हा business माझ्या कुंडलीला suit होतो का ? आणि पुढे व्यवस्थित होईल ना सगळे ?"
कुंडलीला केतूची अंतर्दशा सुरु होती आणि केतू मंगळाच्या नक्षत्रात. मंगळाच्या अंमलाखाली पापड-लोणची हे पदार्थ येतात. म्हटले,"कर business. हा business suit  होतोय. मंगळाची विदशा सुरु होतेय फेब्रुवारी २०१३ ला. म्हणजेच फेब्रुवारीनंतर business settle होण्यास सुरु होईल." तिला धीर तो कसला ?? जागेची शोधाशोध सुरु होतीच. 

जागा मिळाली जानेवारी २०१३ ला आणि ती सुद्धा आधीच्या जागेला लागुनच. (Duality ) (पुन्हा रवि विदशेतच जागा मिळाली.) machine मिळाली. पापड कारखाना सुरु झाला. पण पापडाच्या business ने उंच भरारी घेण्यास सुरवात केली मार्च महिन्यापासूनच. गेल्याच आठवड्यात समिधा भेटायला आली होती. आधीचा business व्यवस्थित सुरु होताच आणि पापड व्यवसायसुद्धा वेग घेतोय. catering business करणाऱ्या संस्थांशी समिधा contract करतेय. पुढील सहा सात महिन्यात तिला ह्या business कडून बरयाच अपेक्षा आहेत.  

शहरात राहून, खूप शिकून आई-वडिलांचा support घेऊन business करणे  कठीण नाही परंतु एखाद्या गावात राहून शिकून,तिथे एक नाही दोन वेगळ्या पद्धतीचे business करणे तेही घरच्यांचा विरोध असतांना…. हे सोप्पे नाही. समिधा जेंव्हा भेटते तेंव्हा हेच बोलते,"madam हे सगळे तुमच्यामुळे शक्य झाले. तुम्ही कुंडलीवरून माझ्या carrier बद्दल स्पष्टपणे सांगितले आणि मी ठामपणे निश्चय घेऊ शकले."  माझे तिला हेच उत्तर असते,"मी तर फक्त मार्ग दाखवला. मेहनत आणि destiny ही पूर्णतः तुझीच." 

येणारा पुढील काळातही समिधाने अशीच प्रगती साधावी व उंच भरारी घ्यावी ही इच्छा.  
 तिला खूप खूप शुभेच्छा देऊन हा लेख इथे थांबवते.   

Note : बुध हा communication शी संबंधीत आहे म्हणजे computer,mobile इ. पहिला व्यवसाय हा mobile/sms संदर्भात होता आणि त्याचवेळी बुध अंतर्दशा असल्याने हा व्यवसाय खूपच चांगला चालेल ह्या बद्दल कुंडलीने खात्रीच दिली आणि त्याचा प्रत्यय समिधाला मिळाला. दुसरा व्यवसाय हा पापडाशी निगडीत होता आणि त्यावेळी केतू अंतर्दशा आणि केतू मंगळाच्या नक्षत्रात. पापड व्यवसाय मंगळाच्या अंमलाखाली येतो त्यामुळे तिथेही तिला प्रगती साधता येईल याबद्दल खात्री आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD