शुक्रवार, १ मार्च, २०१३

दुहेरी कसरत - नोकरी व व्यवसाय


दुहेरी कसरत - नोकरी व व्यवसाय 

काल आपण योगेशला नोकरीतून व्यवसायाकडे वळताना पाहिले. ग्रह आपली कामगिरी कशी चोख बजावतात  ह्याचा अनुभव योगेशला आलाच. आज आपण अशी कुंडली बघुया ज्या कुंडलीत ग्रहांनी नोकरी आणि व्यवसाय ह्या दोन्हींचा छान मेळ बसवलेला आहे. ही कुंडली आहे अशा एका जातकाची ज्याच्यावर खूप लहान वयात कौटुंबिक जवाबदारी आली. कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तीच्या मृत्युनंतर अर्चनाने घरचा व्यवसाय व स्वतःची उच्च पदावरची नोकरी ह्यात छान समतोल राखण्यात यश मिळवलं. आज अर्चनाच्या कुंडलीतील महत्वाच्या ग्रहयोगांवर नजर घालू. 

अर्चना प्रभुणे :  मीन लग्न. लग्नेश गुरु दशमात. षष्ठेश रवि स्वतः नवमात. कालच्या लेखात आपण हे समजून घेतलेच असेल की षष्ठेशाचा संबंध जर नवम स्थानाशी असेल तर व्यक्तिला उच्च-अधिकार प्राप्त होतात, मानसन्मान मिळतो. अर्चनाला नोकरीत खूप लहान वयात उच्च-अधिकार मिळाले. Office मध्ये तिच्या शब्दाला मान आहे. 
 

अर्चनाच्या कुंडलीत चतुर्थेश- सप्तमेश जो बुध आहे तो आहे दशमात. सप्तमेशाचा दशमाशी जर काही connection असेल तर जातक स्वतःचा व्यवसाय सुरु करतो हे आपण कालच पाहिले. इथे ह्या कुंडलीत हा नियम चपखल बसतो. अर्चना व्यवसायाची धुराही छान सांभाळते. परंतु  इथे सप्तमेश- दशमेशाबरोबर मी चतुर्थेशाचाही उल्लेख केला आहे. चतुर्थ स्थान म्हणजे आपले घर,घर संबंधातील गोष्टी. अर्चनाच्या कुंडलीत चतुर्थ (घर-घरासंबंधातील गोष्टी), दशम (व्यवसाय) सप्तम (व्यवसाय -भागीदारी वगैरॆ ) ह्यांचे connection आहे त्यामुळे घरच्या व्यवसायाची जवाबदारी तिच्यावर आली.  
आज अर्चनाला व्यवसाय व नोकरी ह्यातील ताळमेळ बसवताना पाहिले कि खूप कौतुक वाटते. येणारया पुढच्या काळात तिच्या कुंडलीतल्या दशा-अंतर्दशा व्यवसाय व नोकरी ह्यासाठी अत्यंत पूरक असल्याने तिला यश मिळणार हे नक्की. तिला भविष्याकाळासाठी शुभेच्छा. 
भेटू पुढ्या लेखात अशाच काही कुंडल्या घेऊन. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD