गुरुवार, २१ मार्च, २०१३

अष्टम स्थान : मृत्यु की …???????

अष्टम स्थान : मृत्यु की …???????

ज्योतिषशास्त्र शिकत असताना एकदा माझ्या गुरु कुंडलीतील सर्व स्थाने समजावून सांगत होत्या. एकूण बारा स्थाने आणि प्रत्येकाचे वेगळेच महत्व ,कारकत्व वगैरे… प्रथम स्थान म्हणजे तुम्ही स्वतः -तुमचा स्वभाव-तुमचे कसे दिसता वगैरे,द्वितीय स्थान म्हणजे धन स्थान-तुमचे कुटुंब, चतुर्थ स्थानावरून मातृसौख्य ,स्थावर इस्टेट,वाहनसौख्य इ. 
जेंव्हा त्यांनी अष्टम स्थानावर बोलण्यास प्रारंभ केला तेंव्हा पहिलेच वाक्य हे होते : 

" अष्टम स्थान म्हणजे मृत्यू स्थान. ह्या स्थानावरून व्यक्तीला आयुष्य किती लाभले आहे हे विचारात घेतले जाते. अष्टम स्थान म्हणजे अपघात … तडकाफडकी आयुष्यात आलेले बदल,प्रवासातील अडथळे ,प्रवासातील त्रास,नोकरीतील बदल, मानहानी - अपमान वगैरे".   तेंव्हा पासून मला नेहेमी ह्या स्थान बद्दल कुतूहल वाटत आले आहे…(म्हणतात ना माणूस  नकारात्मक गोष्टींवर जास्त विचार करतो) पण ह्या विचारामुळे मला ह्या स्थानाबद्दलच्या बाकीच्याही बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. तो असा की, शास्त्रकारांनी जरी अष्टम स्थानाला मृत्यू स्थान संबोधले असले तरी त्याच्या खोलवर अजूनही मोठा अर्थ लपलेला आहे. तो अर्थ आज मी तुम्हाला एका उदाहरणाने सांगणार आहे. 

साधारणपणे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रशांतने त्याची कुंडली मला दाखवली होती…. तास.. दीड-तास आम्ही त्याच्या कुंडलीवर चर्चा करत होतो. नावाजलेल्या कंपनीत चांगल्या हुद्यावर असलेला प्रशांत खूप खुश होता…. येणारे वर्ष कसे असेल ? नोकरीबद्दलचे, कुटुंबाबद्दलचे प्रश्न इ अनेक प्रश्न आम्ही चर्चिले. 
तूळ रास आणि सिंह लग्नाची प्रशांतची कुंडली. कुंडलीचा अभ्यास करता करता मी त्याला प्रश्न विचारात होते…  कुंडलीत शनि महादशा व शनि अंतर्दशा सुरु आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून अष्टम स्थानाची म्हणजेच "गुरुची " विदशा सुरु होत होती. (गुरु कुंडलीत - ३,५,८ ह्यास्थानाचा कारक आणि तो राहूच्या नक्षत्रात. राहू - ११ ,२,११ ) मी म्हटले काय रे नोकरी सोडण्याचा काही विचार आहे का?? तो म्हणाला, "छे छे … चांगले चालले आहे …सध्या तरी तसा काही विचार नाही."  मी मनात म्हटले कमाल आहे… कुंडलीच्या दशा-अंतर्दशा तर काही वेगळेच चित्र दाखवताहेत आणि हा तर म्हणतोय कि नोकरी सोडणार नाही…. काय गौडबंगाल आहे बाबा … असा मी विचार करतानाच मला वेगळीच शंका आली…. मी विचारले " अरे तुझा येत्या वर्षात नोकरीच्या निमित्ताने प्रवास तर भरपूर होणार आहे परंतु तू नोकरी सोडशील असे ग्रह म्हणताहेत. तुला कदाचित तडकाफडकी नोकरी सोडावी लागेल.तेंव्हा काळजी घे"  त्यावर त्याचे उत्तर असे होते, " सध्या माझ्यावर कंपनीतल्या कामांची खूप मोठी जवाबदारी दिली आहे… बघू नंतर काही विचार बदलला तर…".   साडेसाती सुरु आहे तेंव्हा स्तोत्र व काही उपाय त्याला करण्यास सांगितले. 

मधल्या काळात त्याच्याबद्दल तो फोनवरून मला "UPDATES" द्यायचा. ऐकून बरे वाटायचे…. 

आणि मार्च महिन्याच्या दुसरया आठवड्याच्या एका रविवारी त्याचा फोन आला," तुम्हाला भेटायचे आहे. मोठा प्रोब्लेम झाला आहे. कधी येऊ भेटायला ??".  ठरलेल्या वेळी तो आला. आणि त्याने जे सांगितले ते ऐकून शॉक बसला. त्याच्या office मधल्या त्याच्याचबरोबर काम करणारया निलेशने प्रशांतची कंपनीच्या V. P. (VICE -PRESIDENT ) कडे तक्रार केली होती . प्रशांत दिलेली कामे वेळेत पूर्ण करत नाहीये त्याचबरोबर कंपनीच्या पैशांचा दुरुपयोग करतो,कंपनीतल्या managers ना पार्टी देतो वगैरे. हा निलेश स्वतः  V. P. साहेबांचा चेला. एकाच गावातून दोघेही मुंबईत नोकरीसाठी आले. परंतु निलेश नोकरीत बराच मागे राहिला व V. P. बराच पुढे.  परंतु दोघांमधली मैत्री मात्र घट्ट राहिली. जेंव्हा निलेशला कळून चुकले की प्रशांत असे पर्यंत त्याला ह्या कंपनीत पुढपर्यंत प्रगती साधता येणार नाही त्याने प्रशांतबद्दल तक्रारी करण्यास सुरवात केली.  व कसेही करून प्रशांत स्वतः नोकरी सोडेल असे कटकारस्थान निलेश व V. P.नी रचले. 
 

मार्चच्या  दुसऱ्या आठवड्याच्या शनिवारी Office ला सुट्टी असून सुद्धा प्रशांतला  V. P. ने office मध्ये बोलावून घेतले व त्याच्याबद्दलच्या तक्रारी त्याला ऐकवून प्रशांतवर आरोप करत त्याला Resignation देण्यास भाग पाडले. प्रशांतने समजावण्याचे खूप प्रयत्न केले. प्रशांतच्या Managerने सुद्धा V. P. ला खूप समजावले परंतु V. P. चा निर्णय पक्का झालेला होता. त्याच दिवशी प्रशांतला Resignation द्यावे लागले.  

प्रशांतला मी सांगितले जे होणार होते ते होऊन गेले. तुला नोकरी नक्की मिळेल. त्याला काही उपाय व मंत्र दिले. 

ह्यावरून एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या?? प्रशांतची अष्टम स्थानाची विदशा सुरु झाल्याबरोबर त्याला Officeमध्ये मानहानी सहन करावी लागली. नोकरीत तडकाफडकी बदल झाला. नोकरी अचानक गेल्यामुळे आयुष्याच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला. म्हणजेच अष्टम स्थानाची  सर्व फळे त्याला मिळाली. मी खूप खुश झाले कारण मला ही सुद्धा भीती होती की प्रशांतचा अपघातही होऊ शकतो …. अर्थात ती भीती त्याला मी बोलून दाखवली नव्हती. त्यामुळे जीवावर बेताण्यापेक्षा नोकरीवर बेतलेले काय वाईट????  
प्रशांतच्या पुढच्या प्रवासासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा….  

Bye  Bye 


NOTE : १) जातकाची साडेसाती सुरु आहे व जातकाला राजीनामा शनिवारी देण्यास भाग पाडले आहे. 
              २) ह्या जातकाची पंचम स्थानाची विदशा सुरु झाल्याबरोबर त्याला राजीनामा द्यावा लागला. गेल्या   दोन  CASES मध्ये आपण पहिलेच होते की जोपर्यंत कुंडलीत पंचमाची(पंचम स्थानाची) दशा-अंतर्दशा सुरु होत नाही तोपर्यंत जातकाच्या नोकरीत बदल होत नाही. वरील कुंडलीत पंचम स्थानाची दशा तर सुरु झालीच परंतु अष्टमाचीही दशा सुरु झाल्याने नोकरीत बदल झाला परंतु तो तडकाफडकी, अपमान होउन …. 
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD