रविवार, २४ मार्च, २०१३

एक मजेशीर योग….ज्योतिषाला Challenge

एक मजेशीर योग….ज्योतिषाला Challenge 

ह्या शास्त्राचा अभ्यास करताना काही कुंडल्या मनाला चटका लावून जातात तशा काही कुंडल्या खूप हसवून जातात. मागच्याच आठवड्यात सुनीलने फोने केला आणि भेटण्याची वेळ ठरली. जी वेळ ठरली होती त्यावेळी तो आला …. त्याची कुंडली वाचायला सुरु केले आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. 

वृश्चिक लग्न व मकर राशीची कुंडली. पण कुंडलीतल्या अष्टम स्थानात असलेली शुक्र,मंगळ आणि राहूची युती  बरेच काही सांगून गेली. ज्यांचा ज्योतिष-शास्त्राचा अभ्यास नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते :
१) अष्टम स्थानावरून तुमच्या शारीरिक संबंधांचा अभ्यास होतो.
२) शुक्र हा मुळातच Romantic आहे. शुक्र प्रधान व्यक्तींना टापटीप राहायला आवडते. सर्वांनी मला पहावे माझ्या मोहात पडावे अशा काही धारणा शुक्र प्रधान व्यक्तींच्या असतात. शुक्र हा कामातुर आहे. 
३) मंगळ आक्रमक,वर्चस्व गाजवणारा,परिणामांचा विचार न करताच एखादी गोष्ट करणे,हट्टी इ. असा ग्रह. तर …. 
४) राहु हा फसवा आहे. खोटे आकर्षण आहे. 
सुनीलची कुंडली 
मग पहा शुक्र जो मुळातच प्रणयी,मंगळ  आक्रमक व हट्टी,राहू खोटे आकर्षण तर अष्टम स्थान हे शारीरिक संबंध दाखवते हे संपूर्ण COMBINATION सुनीलच्या कुंडलीत हजर होते. आता मुळ मुद्याकडे वळूया,

सुनीलने प्रश्न विचारण्यास सुरवात केली : १) माझे पैसे खूप खर्च होतात. SAVINGS होत नाहीत. 
२) माझ्या BUSINESS मध्ये माझी कधी प्रगती आहे?
३) बायकोचे आणि माझे जराही पटत नाही.. ती सारखा संशय घेते.मी खूपच साधा आहे हो तिला पटतच नाही. मी मुलींशी बोलतही नाही हो. बघाना तुम्हालाही पत्रिकेवरून समजलेच असेल. 
सुनीलचे शेवटचे वाक्य ऐकून उडालेच. सरळ सरळ CHALLENGE ?? मी सुनील विचारले," ह्या आधी कुठल्या ज्योतिषाला पत्रिका दाखवली आहे का?" अपेक्षित उत्तर आले "नाही". मी म्हटले,"ठीक आहे. आत्ता ऐका …. तुमची पत्रिका मला हे सांगतेय की तुम्ही मुलींपासून जरा सावधान. त्यामुळे तुम्हाला खूप मनःस्ताप होऊ शकतो. तुम्ही मुलींशी बोलतच नाही ही चांगली गोष्ट आहे. माझ्या दृष्टीने तरी तुम्ही सावधगिरी बाळगावी. येत्या काळात एखाद्या महिलेमुळे तुम्ही गोत्यात येऊ शकता. मग त्यातून बाहेर पडणे शक्य नाही."

आत्ता उडण्याची वेळ सुनीलची होती. चेहरा पूर्णपणे पडला. थोडावेळ शांततेत गेला. आणि सुनील उदगारला," ताई मी एकदा एका मुलीकडून फसवलो गेलो आहे. ती माझ्याबरोबर फिरायची.. खुपदा आम्ही तसेही भेटलो आहे(इथे सुनील शारीरिक जवळीकीबद्दल बोलत आहे) आणि तिने मला माझ्याकडून बरयाचदा पैसेही घेतले होते. तिला सोन्याचे दागिनेही करून दिलेत परंतु नंतर तिचे लग्न झाले आणि ती ऑस्ट्रेलियाला निघून गेली."

मी म्हणाले," ठीक आहे जी चूक होऊन गेली ती गेली परंतु ह्यापुढे जरा आवरा स्वतःला …. नाहीतर कोणीही वाचवू शकणार नाही."

सुनीलचा पुढचा प्रश्न," ACTUALLY ताई तिचा मला सारखा फोन येतो. ती आत्ता पुन्हा मुंबईत आली आहे. तिचे तिच्या नवरयाबरोबर जराही पटत नाही. तिच्या नवरयाचे बाहेर संबंध आहेत असा तिला संशय आहे.  त्यामुळे तिने सर्व लक्ष तिच्या carrier वर केंद्रित केले आहे. तिला माझ्याबरोबर BUSINESS करायचा आहे. गुंतवणूक तिचा नवरा करणार आहे… त्यामुळे मला फक्त मेहनत करायची आहे … चालेल का??" (सुनीलने आधी विचारलेले प्रश्नांची उत्तरे ह्या त्याच्या नविन प्रश्नात लपलेली आहेत हे वाचकांच्या ध्यानात आलेच असेल.)

संतापानेच मी म्हटले," अहो सुनील साहेब आताच मी म्हणाले ना की, एखाद्या महिलेमुळे तुम्ही गोत्यात येऊ शकता. मग त्यातून बाहेर पडणे शक्य नाही. मग परत परत तेच काय विचारताय ???? Business म्हटले की तुमचा आणि तिचा पुन्हा संबंध आला म्हणजे पुन्हा येरे माझ्या मागल्या……. " 

त्यावर सुनील साहेब गप्प. मी एखाद्याला सल्ला देऊ शकते परंतु हेच करा आणि तेच करा हे सांगण्याचा अधिकार मला नाही. त्यामुळे मी काही  बोलले नाही. मला माहित होते येणारया काही दशा आणि अंतर्दशा सुनीलसाठी आर्थिक दृष्ट्या आव्हानात्मक असणार आहेत त्यामुळे त्याला त्याच्या मैत्रिणीकडून आलेली "Offer" स्वीकारावी लागणार आणि पुढच्या घटना क्रमवार घडणार. 

तर अशी आहे आपली कुंडली. आपल्या जीवनाचा आरसा. त्यामुळे जेंव्हा कधी ज्योतिषाकडे गेलात तर त्याला कधी Challenge करू नकाच परंतु खोटेही बोलू नका कारण चाणाक्ष ज्योतिषी तुमचे खोटे लगेच पकडेल.  लक्षात ठेवा नक्की …. 

भेटू लवकरच …. 
                                                               

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD