मंगळवार, २ एप्रिल, २०१३

कुंडली दोष नाही हा तर वास्तू दोष


कुंडली दोष नाही हा तर वास्तू दोष 

बरेच दिवस वास्तूवर काही लिहिले नाही म्हणून वाचकांकडून विचारणा होत होती. आजचा प्रपंच त्यासाठीच. 
एकदा एक जोडपे मला भेटण्यासाठी आले होते. नील स्वतः डॉक्टर आणि परी इंजिनीअर . लग्नाला तीन वर्षे झाले तरी बाळाची चाहुल लागली नव्हती. घरचे,मित्रमंडळी, नातेवाईक सगळे विचारणा करत होते.  "Planning" आणि "Carrier" च्या नावाखाली नील व परी पुढचे बोलणे टाळत. परंतु आतल्याआत दोघांनाही ही गोष्ट खात होती. सगळ्या चाचण्या झाल्या. दोघांचे "Reports" अगदी Normal. मग असे का होतेय ते काळात नव्हते. त्यासाठी दोघे आले होते.

दोघांच्या कुंडल्या व्यवस्थित अभ्यासल्यानंतर मला जाणवले की दोघांच्या कुंडलीत तर काहीही दोष नाही मग… .? ? मग मी हा प्रश्न  "प्रश्नकुंडलीप्रमाणे" सोडवण्यासाठी त्यावेळेची प्रश्न कुंडली मांडली. माझ्याकडे आज त्याचे Records नाहीत. परंतु एक गोष्ट ठळकपणे त्या कुंडलीत जाणवली होती ती म्हणजे पूर्व दिशा व आग्नेय दिशा ह्यात दोष असावा. "तुमच्या घरी पूर्वेला काही जड वस्तू आहे का? मुख्यप्रवेशद्वार कुठे आहे ?" असे प्रश्न विचारल्यानंतर कोणाकडूनही उत्तर नाही. आज डॉक्टर आणि इंजिनीअर असलेल्या जोडप्याला पूर्व दिशा सांगता न यावी ???? कमाल आहे …..  त्यावर नील उत्तरला,"तुम्ही आमच्या घरी येऊ शकाल का ?"   मग वास्तू परिक्षणाचा दिवस ठरला.


ईशान्य दिशेत असलेले प्रवेशद्वार, पूर्णपणे बंद असलेली पूर्व दिशा व आग्नेय कट अशी नीलची वास्तू. 


१) पूर्व दिशा म्हणजे उर्जेचं स्त्रोत. सुर्य ह्या दिशेने उदय होतो व समस्त जगाला जगण्याची ऊर्जा,उर्मी व उत्साह देतो. अशी पूर्व दिशा नीलच्या घरी पूर्णपणे बंद होती म्हणजेच ह्या दिशेत एकही खिडकी नव्हती. पूर्व दिशेत जर दोष असेल तर घरातील पुरुषांचे वर्चस्व कमी होते,ठाम Decision घेत येत नाही, अत्यंत मानसिक गोंधळ होतो. 

२)ईशान्य दिशा म्हणजेच ईश्वराची दिशा. ईश्वर सर्व दिशेस असतो परंतु इथे ईशान्य दिशेत "Positive Energy" च्या संदर्भात आपण ही दिशा विचारात घेतो. साहजिकच इथे देवघर किंवा तत्सम चांगल्या गोष्टी असल्या तर घरातील चांगल्या उर्जेचा प्रवाह वाहण्यास मदत होते. नीलच्या घराचे प्रवेशद्वार नेमके ईशान्य दिशेत. आता तुम्ही म्हणाल ईशान्य दिशेत प्रवेशद्वार चांगली गोष्ट आहे ना Boss. वरकरणी चांगली वाटत असली तरी प्रवेशद्वार म्हणजेच वास्तूला त्या दिशेत कट आला असे वास्तुशास्त्र सांगते. ईशान्य दिशेत आलेल्या ह्या कटमुळे कर्त्या पुरुषाच्या प्रगतीत अडथळे येतात. 

३)आग्नेय दिशेत मोठी खिडकी होती. इथेच मोठी गोम होती. आग्नेय दिशेत जर कट असेल म्हणजेच खिडकी/मुख्य-प्रवेशद्वार असेल तर वंश वाढण्यास बरेच अडथळे निर्माण होतात. आग्नेय म्हणजेच अग्नि. ह्या दिशेतल्या दोषांचे परिणाम घरातील स्त्रियांना भोगावे लागतात. स्त्रीला पोटाचे विकार/तक्रारी सुरु होतात. 

ह्या सर्व गोष्टी मी नीलला विचारल्यानंतर त्याने हे मान्य केले कि ह्या वास्तूत आल्यापासून त्याला नोकरीत खूप त्रास होत होता. सात महिन्यांपुर्वीच त्याला परदेशात नोकरी मिळाली होती. पगार चांगला व इतर सुविधाही होत्या परंतु दोन वर्षांसाठी तिथे गेलेल्या नीलला चार महिन्यातच करमेनासे झाले व तो तडकाफडकी इथे निघून आला. इथे आल्यानंतरही त्याला काही ठरवता येईना. ( पूर्व दिशा दोष - निर्णयक्षमता कमकुवत), परीला नुकतीच नवीन नोकरी लागली होती परंतु तब्येतीच्या वारंवार तक्रारीमुळे तिला कामावर लक्ष केंद्रित करता येईना. तब्येतीच्या काय तक्रारी आहेत असे विचारल्यावर परीने सांगितले तिला गर्भाशयात "Fibroids" आहेत व त्याची Treatment चालू आहे. ( आग्नेय दोष  - स्त्रियांना पोटाचे विकार/ तक्रारी) सर्व कहाणी लक्षात आल्यानंतर नील व परीला वास्तुदोष नीट समजावले. त्यावरील उपाय काय आहेत ? कसे करायचे इ. त्यांना explain केले. त्यांनाही ते पटले. 

वास्तू-दोष परिहाणार्थ  काढलेल्या मुहूर्तावर काही ठराविक धातू - रत्ने दोष असलेल्या ठिकाणी मंत्रोच्चार करून पुरण्यात आली. नील व परीला काही स्तोत्रे दररोज वाचण्यास सांगितली. 

त्यानंतर दोन महिन्यांनी परीच मला भेटण्यास आली. काही बोलण्याच्या आधीच तिच्या चेहेरयावरील तेजस्वीपणा व टवटवीतपणा गोड बातमी सांगत होता. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नील भेटायला आला तोच पेढे घेऊन… "मुलगा झालाय …. बारसे आहे ३० नोव्हेंबरला.. तुम्ही यायचेच… कुंडली तुमच्याकडून बनवून घ्यायची आहे."  त्याला कुंडली बनवून दिली व बाळासाठी काही नावेही सुचवली. त्याला बारश्याला येण्याचे आश्वासन दिले व मनोमन शास्त्राला दंडवत घातला. 

काय ?? तुम्हीही मानले कि नाही ? मग कळवा मला ह्या ई-मेल ID वर - anupriyadesai@gmail.com
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD