रविवार, २१ एप्रिल, २०१३

परदेशगमन योग

परदेशगमन योग 


आजकाल चांगली नोकरी कधी मिळेल हा प्रश्न विचारला तर जातोच त्याचबरोबर नोकरीनिमित्ताने परदेशात रहायचे योग आहेत का माझ्या कुंडलीत ???? हा प्रश्न सर्रास विचारला जातो. 

दिनेश प्रसिध्द अशा IT कंपनीत नोकरीला आहे. मागच्या सहा वर्षापैकी ३ वर्षे तो अमेरिकेला राहिला आहे. त्यानंतर काही कौटुंबिक कारणामुळे त्याला भारतात परतावे लागले.  भारतात परतल्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा त्याला अमेरिका ,तेथील राहणीमान याची आठवण येऊ लागली. बरयाचदा मी हे ऐकते आणि पाहिले आहे कि एकदा अमेरिकेला गेल्यावर तिथल्या राहणीमानाची लोकांना सवय होते. मग त्यांना भारतात करमेनासे होते. दिनेशलाही आता अमेरिकेचे वेध लागले होते परंतु गेल्यावेळेस तडकाफडकी भारतात निघून आल्याने वरिष्ठ त्यावर नाराज होते. आता करायचे काय ? जायचे तर अमेरिकेला आणि वरिष्ठ जाऊ देत नाहीत आणि त्यात त्याने जाऊ नये म्हणून इथले म्हणजे भारतातले काही Projects त्याला देण्यात आले. आता ही गुगली होती कारण एकदा हा Project हातात घेतला कि वर्षभर तरी त्याची रवानगी अमेरिकेला नाही आणि Project वर काम करणार नाही असे म्हणूनही चालणार नाही. कारण त्याने Ratings वर परिणाम झाला असता. मग आता ????? 

दिनेश अगदी बारीकसा चेहेरा करून मला विचारात होता …मी  कधी जाऊ शकेन ? मी इथे आता जास्त काळ नाही राहू शकत. काय सांगतेय माझी कुंडली?? कुंडलीवरून ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यापेक्षा प्रश्नकुंडलीवरून हा प्रश्न सोडवावा म्हणून मी प्रश्नकुंडली मांडली. 

तूळ लग्नाची कुंडली. ज्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नाही त्यांच्यासाठी :  जेंव्हा जातक मनापासून प्रश्न विचारतो तेंव्हा कुंडली तसे Reflect करते. चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यामुळे जातकाने जरी काही प्रश्न स्पष्टपणे ज्योतिषाला नाही विचारले तरी चंद्र प्रश्नकुंडलीत व्यवस्थितपणे जातकाच्या मनाचे प्रतिबिंब दाखवतो. तर इथे तुळ लग्न. चंद्र स्वतः षष्ठ स्थानात (नोकरीचे स्थान ) चंद्राची कर्क राशी लाभ स्थानात. म्हणजेच नोकरीत त्याला अपेक्षित आहे त्याचा त्याला लाभ होणार आहे. खाली त्यादिवशीचे रूलिंग मांडतेय. रूलिंग म्हणजेच प्रश्न विचारल्येला दिवशीचे Dominating Planets. तर रूलिंगज़   खालीलप्रमाणे :

L  - शुक्र ८, १, ८          न. स्वा. चंद्र ५, १० 

S  - शनि १२, ४, ५      न.स्वा. मंगल १०, २, ७ 

R  - गुरु ७, ३, ६          न.स्वा. शुक्र ८, १, ८ 

D  - बुध  ५, ९, १२       न. स्वा. शनि १२, ४, ५ 

कुंडलीतील बारावे स्थान हे जन्मठिकाणापासून दूर जाण्याचे योग दर्शवतो. जर जातकाला भारताबाहेर जायचे आहे तर बारावे स्थान हे बलवान हवे. [फार ज्योतिषशास्त्राचे "किचकट" गणित इथे संपूर्णपणे उलगडत नाहीये कारण त्यामुळे ज्योतिषाचा अभ्यास नसलेल्यांचा Interest जाईल.]  इथे बुध १२ व्या स्थानाचा निर्देशक आहे आणि तो शनिच्या नक्षत्रात आहे. शनि सुद्धा १२व्या स्थानाचा निर्देशक. 

हा प्रश्न मला दिनेशने गेल्या एप्रिलमध्ये विचारला होता. येणारया दशा सप्टेंबर व ऑक्टोबर ह्या काळात अमेरिकेला दिनेश जाईल असे चित्र होते. आता हे दिनेशला सांगायचे म्हणजे पंचाईत कारण दिनेशला उद्याच जा असे Managerने म्हटले असते तरी त्याची तयारी होती. अशा व्यक्तीला सांगायचे अरे तुला पाच महिने तरी निदान थांबावे लागेल. शास्त्राचे नियम चुकत नाहीत. त्याला स्पष्टपणे सांगितले, "दिनेश तुला जरी घाई असली तरी नियतीने तुझे अमेरिकेला जाणे सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या दरम्यान ठरवलेले आहे." चेहेरा हिरमुसलेला झाला पण इलाज नाही. "ठीक आहे बघू ", असे म्हणून दिनेश निघाला त्याला काही मंत्र व उपाय दिले. 

मे व जुन महिना दिनेश अथक प्रयत्न करत होता पण त्याला दाद मिळत नव्हती. तोपर्यंत त्याच्या managerने त्याची वरती तक्रार केली होती ती न जुमानता दिनेशचे प्रयत्न सुरूच राहिले. ह्या प्रयत्नांना यश मिळाले आणि त्याला अमेरिकेचा Project मिळाला आणि तोही जुलैच्या पहिल्या आठवड्यात. दिनेशचा आनंदाने मला फोन आला पण एक गडबड होती. आता Project तर मिळाला परंतु तोपर्यंत दिनेशचा Visa संपला. [शक्यतो ज्यांचा Visa  आहे त्याच व्यक्तीला Project दिला जातो परंतु इथे दिनेशने काही प्यादी वेगळ्या पद्धतीने हलवली होती.] आता Visaची वाट बघा. Visaसाठी दिनेशला मद्रासला जावे लागले तिथे सगळ्या तांत्रिकी गोष्टी झाल्या आणि काही दिवसातच Visa मिळेल म्हणून सांगण्यात आले. सप्टेंबर उजाडला. दिनेशला धाकधूक होती. सप्टेंबर आला तसा गेला आणि दिनेशचा Patience संपला. कारण Project Manager चा सतत फोन येत होता. 

ऑक्टोबरच्या पहिल्या तारखेला दिनेशशी  माझे बोलणे झाले त्याला म्हटले जरा थांब. सांगितलेली उपासना सुरूच ठेव. ऑक्टोबर गेला नाहीये. त्याला कसला धीर,"ताई ही संधी गेली तर माझे Rating खूप कमी होईल. इथे मला त्रास देतील तो वेगळाच कारण इतके महिने इथल्या कुठल्याही Project ला मी हात लावलेला नाही." मी जास्त काही म्हणाले नाही कदाचित काळ उत्तर देईल. आठ ऑक्टोबर उजाडला आणि सकाळी सकाळी मला दिनेशचा फोन आला ती खुशखबर देण्यासाठी. त्याला Visa ही मिळाला आणि १४ ऑक्टोबरचे तिकीटही मिळाले. खूप खुश होता दिनेश आकाश ठेंगणे झाले होते त्याला त्यादिवशी. 

नेहेमीप्रमाणे शास्त्राने आपले काम चोख बजावले. मी संपूर्णपणे नतमस्तक आहे आणि तुम्ही ????
 कळवा मला इथे नक्की  : anupriyadesai@gmail.com 

NOTE : Ruling मध्ये शनि आहे. जरी तो १२ स्थानाचा कार्येश होतोय तरी शनिचे नैसर्गिक गुणधर्म "विलंब करणे" हा आहे त्यामुळे दिनेशला Visa मिळण्यास विलंब झाला. 

ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD