मंगळवार, १६ एप्रिल, २०१३

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा  सकाळी ११. ३० ची appointment आवरली आणि मी नेहेमीचे वाचन सुरु केले तेवढ्यात शीतलचा फोन. " मला तुमचा नंबर माझ्या मैत्रिणीने दिला. तुम्ही कुंडली पाहता ना ? मला तुम्हाला भेटायचे आहे … कधी येऊ शकते ?"  तिला दोन दिवसांनंतरची appointment दिली. ठरल्यावेळी शीतल आली आणि तिच्या चेहेऱ्यावरचे tension बघून मी समजले काहीतरी मोठा Problem आहे. (आणि Problem नसेल तर ती माझ्याकडे आली कशाला असती ??) उन्हाळ्याचे दिवस त्यामुळे गार पाणी दिले थोडा वेळ जाऊ दिला. ती जरा शांत झाली.


तिच्या पत्रिकेवर दृष्टीक्षेप टाकला असता दशमातील तुळ  राशीतील शुक्र व राहू युति कुंडलीचा वेगळेपणा  सांगून गेली. तिला विचारले तुझे काही सौंदर्यप्रसाधना संदर्भात कामकाज आहे का ? ती हसली आणि म्हणाली ,"हे समजते कुंडलीवरून ????"  म्हटलं …"त्यालाच कुंडली म्हणतात." तर तिची नोकरी ही अत्तराशी संबंधात होती. अत्तर म्हणजेच आताच्या भाषेत "Perfume"च्या  कंपनीत हिचे काम चांगल्या दर्जाचे सुगंध निवडणे. पुढे त्यावर Processing होऊन Brand Name वगैरे वगैरे…सप्तमात असलेला कर्केचा शनि बुधाच्या नक्षत्रात. सप्तम स्थान प्रत्येकाच्या Married Life ची Story सांगते.फक्त शनि आला म्हणून वाईट नाही परंतु कुंडली बघितल्यावर हे लक्षात आले का सप्तमाचे जे अष्टम स्थान आहे म्हणजे जिथे कुंभ ही राशी आहे आणि त्याचा स्वामी शनि सप्तमात आला आहे. शनि स्वतः बुधाच्या नक्षत्रात. (बुध म्हणजे Duality. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा दोनदा effect मिळणे. ज्यांच्या कुंडलीत बुधाचा सप्तम स्थानाशी संबंध येतो व बाकी ग्रहही पूरक असतील तर व्यक्तिचा दोनदा विवाह होतो.) सप्तम स्थानात कर्क रास. कर्केचा स्वामी चंद्र हा कुंभ राशीत आहे व कुंभेचा स्वामी शनि आत्ताच पाहिले …. बुधाच्या नक्षत्रात.

आत्ता पारंपारिक ज्योतिषीय पध्दतीने मला तिची व्यथा समजली परंतु म्हटले कृष्णमुर्ती पध्दतीनेसुद्धा बघू. म्हणून कृष्णमुर्ती पध्दतीचे Significator Page काढले आणि इथे मी ठाम झाले कि इथे ती तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलयला आली आहे. सप्तमाचा सब लॉर्ड रवि आणि तो अष्टम स्थानाचा बलवान कार्येश.  मागच्या एका लेखात मी सांगितले होते अष्टम स्थान म्हणजे अडथळे,अपघात,प्रचंड मनःस्ताप कधीतर मृत्यूच.  मृत्यू म्हणजे काय?? एखाद्या गोष्टीचा अंत म्हणजे मृत्यू. इथे वैवाहिक जीवनात बरीच वादळे येऊन शीतलला प्रचंड मानसिक त्रास झालेला असण्याची शक्यता आहे. बरे हा मानसिक त्रासाचे कारण काय ते तरी बघुया म्हणून तिच्या पंचम स्थानावर दृष्टी टाकली आणि उत्तर सापडले. पंचम स्थान म्हणजेच संतत्ती स्थान. लग्नानंतर काही वर्षात होणारया बाळाची सर्वचजण वाट बघत असतात. हिच्या पंचम स्थानात गुरु तोही वक्री. गुरु ज्या स्थानात असतो त्या स्थानाची फळे नष्ट करतो. पंचम स्थानावर मंगळासारख्या ग्रहाची आठवी दृष्टी. कृष्णमुर्ती पध्दतीने पंचमाचा सब लॉर्ड सुद्धा गुरुच असून तो चतुर्थ व व्यय म्हणजेच प्रतिकूल भावांचा कार्येश आहे. तेंव्हा हिला Pregnancy राहिली तरी पुढे धोका आहे. म्हणजेच Miscarriageचे योग आहेत. सगळी कहाणी लक्षात आल्यावर तिला तसे विचारले आणि ती स्तब्ध झाली. मला उत्तरे मिळाली. 

लग्नाला ९ वर्षे झाली तरी शीतलच्या घरी बाळाचे आगमन झाले नव्हते. मधल्याकाळात तिला दोनदा Pregnancy राहिली परंतु दोन्ही वेळेस Miscarriage झाले. डॉक्टरांनी तिला पुढे कधीही बाळ होणार नाही हे सांगितले. त्यामुळे तिच्या सासरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले होते.परंतु माणूस आशेवर जगतो. पुढे काही आशा आहे का हा तिचा प्रश्न होता. येणाऱ्या पुढील दशा- अंतर्दशा ह्या संततीसाठी पूरक नाहीत ह्याची तिला स्पष्ट कल्पना दिली.  काही वेळेस खूप स्पष्ट बोलावे लागते कारण जातकाला त्या स्पष्टपणाची गरज  असते.  

तिला बाळ होत नाहीये म्हणून तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली गेली होती. भविष्यात काय लिहिले आहे हे जाणून घेऊन तिला निर्णय घ्यायचा होता. तिला तिचे उत्तर मिळाले आणि मला ग्रहांनी पुन्हा एकदा प्रचिती दिली. धन्य ते शास्त्र आणि धन्य ते के एस कृष्णमुर्ती  ज्यांच्यामुळे इतके अचूक भविष्य सांगता येते आणि त्यामुळे आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेण्यास मदत होते. 

Note : सप्तम स्थानही बिघडलेले असल्याने इथे घटस्फोट मिळणार हे निश्चित आहे. 

तिची कहाणी ऐकल्यावर मनात आले, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा 

कशी वाटली ही Case?? नक्की कळवा - anupriyadesai@gmail.com

1 टिप्पणी:

अमोल केळकर म्हणाले...

उपयुक्त माहिती, कुंडलीचे चित्र लावल्यास समजण्यास अधिक सोपे जाईल असे वाटते

READERS ALL OVER THE WORLD